देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 – देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदासाठी 100 जागांची मोठी भरती निघाली आहे.नोकरीचे ठिकाण बँकेच्या शाखा असून पहिले 6 महिने 15,000 रुपये आणि नंतर 18,000 रुपये प्रति महिना पगार मिळेल, अर्जाची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2026 आहे.या भरतीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि MS-CIT असलेले उमेदवारऑनलाईन अर्ज करू शकतात, निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे होईल.बँकेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका, आजच अर्ज करा आणि तुमचे बँकिंग करिअर सुरू करा.
| देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 Online Form (एकूण पदे 100) |
| Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 Examination : Short Details of Vacancy |
| sarkarijobnamo.com |
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 – Important Dates
| बाब | तपशील |
|---|---|
| पोस्ट चे नाव | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी |
| संस्थेचे नाव | देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर (शेड्युल्ड बँक) |
| जाहिरात नंबर | 130/2026-27 |
| एकूण जागा | 100 जागा |
| अर्ज सुरू तारीख | 14/10/2026 सकाळी 11.00 वाजेपासून |
| अर्ज शेवटची तारीख | 31/10/2026 रात्री 11.59 पर्यंत |
| पगार | पहिले 6 महिने रु. 15,000/-, पुढील 6 महिने रु. 18,000/- प्रति महिना |
| शैक्षणिक पात्रता | पदवी + MS-CIT |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
| नोकरीचा प्रकार | प्रशिक्षणार्थी 1 वर्ष, नंतर परिवीक्षा 6 महिने |
| अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक | https://deogiri.mucbf.in/home |
| अधिकृत वेबसाईट लिंक | https://deogiribank.com/ |
| अधिकृत जाहिरात PDF पहा | PDF पहा |
| टीप: सर्व माहिती 130/2026-27 जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा. | |
| —–“बँकेतली पहिली पायरी कठीण असते, पण तीच पायरी तुमचं संपूर्ण करिअर घडवते.”—– | |
देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 – फी डिटेल्स
| कॅटेगरी | फी |
|---|---|
| General / OBC / EWS candidate fees | रु. 944/- (रु. 800 + 18% GST) + बँक चार्जेस |
| Female candidates (all categories) fees | रु. 944/- (रु. 800 + 18% GST) + बँक चार्जेस |
| sc/ st candidate fees | रु. 944/- (रु. 800 + 18% GST) + बँक चार्जेस |
| PH candidate fees | रु. 944/- (रु. 800 + 18% GST) + बँक चार्जेस |
| mode of payment | Online: Debit Card, Credit Card, UPI, Net Banking |
| परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही पात्र आहात याची खात्री करा. अर्ज भरताना अडचण आल्यास exam@mucbf.in या ई-मेलवर किंवा 80871 41209 या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. | |
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 Notification – Age limit as of 01/10/2026
| वयोमर्यादा | एकूण पदे |
|---|---|
| 1] Minimum Age – 22 वर्षे | 100 |
| 2] Maximum Age – 35 वर्षे | |
| 3] SC/ST/OBC/ EWS सवलत – जाहिरातीत स्वतंत्र उल्लेख नाही |
देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 – Eligibility Criteria
| निकष |
|---|
| उमेदवार भारतीय नागरिक असावा. |
| अर्ज करताना स्वतःचा वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे अनिवार्य आहे, कारण सर्व माहिती याच माध्यमातून दिली जाईल. |
| उमेदवाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. |
| अर्जात दिलेली माहिती चुकीची आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर अर्ज रद्द केला जाईल. |
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 – Educational Qualification
| अ.क्र. | आवश्यक पात्रता | तपशील |
|---|---|---|
| 1 | पदवी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी |
| 2 | संगणक पात्रता | MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र |
| 3 | तारीख अट | दि. 30/09/2026 रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असावी |
| 4 | अंतिम वर्ष उमेदवार | जर पदवीचे अधिकृत वेबसाईटवर प्रमाणपत्र आले असेल तर मूळ प्रमाणपत्र बँकेत सादर करावे लागेल आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल |
| प्राधान्य: JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण उमेदवार तसेच ICM, IIBF, VAMNICOM सारख्या शासनमान्य संस्थेतून बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका केलेल्या आणि बँक किंवा पतसंस्थेत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. | ||
देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 – Vacancy Details
| पोस्टचे नाव | एकूण जागा | नोकरी ठिकाण |
|---|---|---|
| प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 100 | बँकेच्या शाखा व विभाग |
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 निवड प्रक्रिया – Selection Process
| निवडीचा टप्पा | तपशील |
|---|---|
| 1] ऑनलाईन परीक्षा – | 100 गुण |
| 2] कागदपत्र पडताळणी – | 1:3 प्रमाणात उमेदवार बोलावले जातील |
| 3]मुलाखत – | 10 गुण (शैक्षणिक पात्रतेसाठी 5 गुण + मुलाखतीसाठी 5 गुण) |
| 4] अंतिम निवड सूची – | ऑनलाईन परीक्षा + मुलाखत गुणांची बेरीज करून 100 गुणांपैकी तयार केली जाईल |
देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 – Exam Pattern
| अ.क्र. | परीक्षेचा विषय | भाषा | एकूण प्रश्न | एकूण प्रश्न | कालावधी |
|---|---|---|---|---|---|
| 1 | संख्यात्मक आणि गणितीय क्षमता | इंग्रजी व मराठी | 40 | 40 | एकत्रित 120 मिनिटे |
| 2 | इंग्रजी भाषा आणि व्याकरण | इंग्रजी | 20 | 10 | |
| 3 | संगणक आणि सहकार ज्ञान | इंग्रजी व मराठी | 20 | 10 | |
| 4 | बौद्धिक चाचणी | इंग्रजी व मराठी | 20 | 20 | |
| 5 | बँकिंग आणि सामान्य ज्ञान | इंग्रजी व मराठी | 20 | 20 | |
| एकूण | 120 | 100 | 120 मिनिटे | ||
| परीक्षेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर राहील. परीक्षेत मिळालेले गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून अंतिम निवड होईल. मुलाखतीसाठी गैरहजर राहिल्यास उमेदवार अंतिम निवडीस अपात्र राहील. | |||||
देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 – Online Form कसा भरावा Step by Step
| स्टेप | प्रक्रिया |
|---|---|
| 1. | प्रथम http://www.mucbf.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. |
| 2. | देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 या लिंकवर क्लिक करा. |
| 3. | New Registration वर क्लिक करून तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भरा. |
| 4. | तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड ई-मेल / SMS द्वारे मिळेल. |
| 5. | लॉगिन करून वैयक्तिक माहिती, पत्ता आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा. |
| 6. | तुमचा नवीन फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करा |
| 7. | पदवी आणि MS-CIT प्रमाणपत्राची माहिती अचूक भरा. |
| 8. | संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा तपासा, चूक असल्यास दुरुस्त करा. |
| 9. | ऑनलाईन पद्धतीने रु. 944/- परीक्षा शुल्क Debit Card, Credit Card, UPI किंवा Net Banking ने भरा. |
| 10. | अर्ज Submit करा आणि अर्जाची प्रिंट आणि फी पावती डाउनलोड करून जपून ठेवा. |
| महत्वाच्या अटी: निवड झाल्यावर उमेदवाराला रु. 500/- च्या बॉन्ड पेपरवर करारनामा आणि रु. 30,000/- सुरक्षा अनामत रक्कम बँकेकडे मुदत ठेव म्हणून जमा करावी लागेल. ही रक्कम बँकेच्या सेवेत 5 वर्षे पूर्ण केल्यानंतर व्याजासह परत मिळेल. 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिल्यास 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागेल, नोटीस न दिल्यास सुरक्षा अनामत जप्त होईल. उमेदवाराची वैद्यकीय तपासणी बँकेच्या डॉक्टरांकडून होईल. | |
| Note – सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपला फॉर्म भरण्यापूर्वी Official Notification काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरावा. (Last Date, Age Limit, & Education Qualification) | |
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 – महत्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| जाहिरात प्रसिद्ध | 14/10/2026 |
| ऑनलाईन अर्ज सुरू | 14/10/2026 सकाळी 11.00 |
| अर्जाची शेवटची तारीख | 31/10/2026 रात्री 11.59 |
| फी भरण्याची शेवटची तारीख | 31/10/2026 |
| Join WhatsApp Channel | Follow Now |
| Join Telegram Channel | Follow Now |
देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 महत्वाचे दुवे – Important Links
| लिंकचा प्रकार | लिंक |
|---|---|
| Check Official Notification PDF | Click Here |
| Official Website | Click Here |
| Apply Online | Click Here |
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 FAQs – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q1.देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
उत्तर: उमेदवारांनी mucbf.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 14 ऑक्टोबर 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी New Registration करून संपूर्ण माहिती भरावी आणि रु. 944/- परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे.
Q2.देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 ची जाहिरात PDF कुठे मिळेल?
उत्तर: या भरतीची अधिकृत जाहिरात PDF क्रमांक 130/2026-27 ही महाराष्ट्र अभिनव को-ऑप बँक्स फेडरेशनच्या mucbf.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी PDF काळजीपूर्वक वाचावी.
Q3. Deogiri Bank Recruitment 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर:देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदासाठी एकूण 100 जागांसाठी ही भरती होत आहे.
Q4.देवगिरी बँक भरती 2026 साठी पात्रता काय आहे? Freshers अर्ज करू शकतात का?
उत्तर: होय, Freshers उमेदवार अर्ज करू शकतात. कोणत्याही शाखेची पदवी आणि MS-CIT प्रमाणपत्र असलेले 22 ते 35 वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. अनुभवाची अट नाही.
Q5.देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 14 ऑक्टोबर 2026 रोजी झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.
Q6.देवगिरी बँक भरती 2026 चा निकाल (Result) कधी लागेल?
उत्तर:ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर निकाल mucbf.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. सध्या निकालाची तारीख जाहीर झालेली नाही, ती लवकरच अपडेट केली जाईल.
Q7. देवगिरी बँकेत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदाचा पगार किती आहे?
उत्तर: निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या 6 महिन्यांसाठी रु. 15,000/- प्रति महिना आणि पुढील 6 महिन्यांसाठी रु. 18,000/- प्रति महिना प्रशिक्षण भत्ता / पगार दिला जाईल.
Q8.Deogiri Bank Careers साठी निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया 3 टप्प्यात होईल – 1) 100 गुणांची ऑनलाईन परीक्षा, 2) 1:3 प्रमाणात कागदपत्र पडताळणी, 3) 10 गुणांची मुलाखत. अंतिम निवड यादी परीक्षा आणि मुलाखतीच्या एकूण गुणांवरून तयार केली जाईल.
Q9.देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या शाखा (Branches) कुठे आहेत? नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
उत्तर: देवगिरी नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बँकेच्या विविध शाखा आणि विभागांमध्ये गरजेनुसार केली जाईल.
Q10.अर्ज करताना अडचण आल्यास कुठे संपर्क करावा?
उत्तर:ऑनलाईन अर्ज किंवा परीक्षा शुल्काबत अडचण आल्यास उमेदवार exam@mucbf.in या ई-मेलवर किंवा 80871 41209 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 टिप्स आणि तयारी कशी करावी – Strategy
जर तुम्हाला या भरती मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा.
1. Syllabus आणि Pattern समजून घ्या
- गणित आणि बौद्धिक चाचणीला सर्वाधिक 60 गुण आहेत, त्यावर जास्त लक्ष द्या.
- बँकिंग आणि सामान्य ज्ञानासाठी रोज चालू घडामोडी वाचा.
- संगणक आणि सहकार ज्ञान हा स्कोरिंग विषय आहे, MS-CIT ची पुन्हा उजळणी करा.
2. टाईम टेबल बनवा
- रोज किमान 5-6 तास अभ्यास करा, 2 तास गणितासाठी राखीव ठेवा.
- आठवड्यातून 2 मॉक टेस्ट द्या आणि चुका तपासा.
- इंग्रजी व्याकरणासाठी रोज 30 मिनिटे सराव करा.
3. महत्वाचे टॉपिक
- संख्यात्मक क्षमता: टक्केवारी, नफा-तोटा, सरासरी, काळ-काम-वेग.
- बौद्धिक चाचणी: मालिका, रक्तसंबंध, दिशा ज्ञान, बैठक व्यवस्था.
- बँकिंग ज्ञान: RBI, सहकारी बँका, NPA, KYC, डिजिटल बँकिंग.
4. Exam च्या दिवशी काय करावे
- प्रवेशपत्र आणि मूळ ओळखपत्र वेळेवर घेऊन केंद्रावर 30 मिनिटे आधी पोहोचा.
- सोपे प्रश्न आधी सोडवा, कठीण प्रश्नावर वेळ वाया घालवू नका.
- घाईगडबडीत चुकीचे उत्तर टाळा, शांत मनाने पेपर सोडवा.
महत्वाचे विषय + पुस्तके
- Quantitative Aptitude – R.S. Aggarwal,
- Banking Awareness – Arihant,
- Computer Knowledge – Lucent,
- मराठी चालू घडामोडीसाठी मासिके.
शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪
| 💡 प्रो टिप – एक्झाम 100% क्रॅक करण्यासाठी |
|---|
| रोज मॉक टेस्ट देऊन तुमचा वेग वाढवा, कारण 120 मिनिटांत 120 प्रश्न सोडवणे हेच खरे कौशल्य आहे. अचूकता आणि वेग यांचा समतोल ठेवणारा उमेदवारच टॉप 100 मध्ये येतो. |
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. अभ्यासासाठी दररोज किती वेळ द्यावा?
उत्तर: रोज 5 ते 6 तास दर्जेदार अभ्यास पुरेसा आहे.
2. कोणते टॉपिक सर्वात महत्वाचे आहेत?
उत्तर: गणित, बौद्धिक चाचणी आणि बँकिंग ज्ञान हे तीन विषय सर्वात महत्वाचे आहेत.
3. Exam च्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?
उत्तर: प्रवेशपत्र विसरणे, कठीण प्रश्नात अडकणे आणि शेवटच्या 10 मिनिटांत घाई करणे या चुका टाळा.
| 💡 प्रो टिप – शेवटच्या15 दिवसांचा प्लॅन |
|---|
| पहिले 15 दिवस सर्व विषयांची उजळणी आणि नोट्स तयार करा. पुढील 10 दिवस रोज 1 मॉक टेस्ट आणि त्याचे विश्लेषण करा. शेवटचे 5 दिवस फक्त फॉर्म्युले, बँकिंग टर्म्स आणि चालू घडामोडी वाचा. |
🚨 महत्वाचे: रोजच्या भरती अपडेटसाठी आत्ताच आमच्या Telegram/WhatsApp ग्रुपला जॉईन करा – एकही संधी चुकवू नका!
महत्त्वाचे टॅग – देवगिरी बँक भरती 2026, Deogiri Bank Bharti 2026, Sahakari Bank Bharti, Chhatrapati Sambhajinagar Bank Jobs, Trainee Junior Officer Bharti, Bank Bharti 2026 Maharashtra, Sarkari Job Namo
Disclaimer – दिलेली माहिती अधिकृत अधिसूचनेवर आधारित आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी. Sarkari Job Namo.com हे कोणत्याही भरतीची हमी देत नाही.
.
इतर संबंधित भरती पहा (Related Jobs)
DMER गट-ड भरती 2025 सुधारित नोटीस जाहीर – DV तारीख 29/10/2026
RRB NTPC Salary 2026: Ticket Clerk, Station Master Pagar Kiti?
Nashik Kotwal Bharti 2026 – सुवर्णसंधी 15 जागा | Last Date 17/10/2026 पगार 15,000
ठाणे कोतवाल भरती 2026 111 जागा सुवर्णसंधी | Last Date 24/10/2026 पगार 15,000